HW News Marathi
मनोरंजन

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

मुंबई | टीव्ही ते बॉलिवूड असा अभिनयाचा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूर यांनी आत्महत्या केली आहे. सुशांत सिंग राजपूतने वयाच्या ३४ वर्षी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्या केल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजरने आत्महत्या केली होती. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली.

सुशांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरिअल ‘किस देश मे हा मेरा दिल’ मधून झाली. यानंतर त्याला खरी लोकप्रियता दिग्दर्शक एकता कपूर यांची सिरिअल ‘पवित्र रिश्ता’मधून मिळाली. यानंतर सुशांतने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. ‘काय पो छे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील सुशांतच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले होते. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटात वाणी कपूर आणि परिणीती चोप्राोसबत त्याने काम केले . यानंतर ‘केदारनाथ’, ‘पीके’ सारख्या सुपरहिट चित्रपटातही त्याने काम केले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… धनत्रयोदशीचे महत्व !

News Desk

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

Aprna

मोडी लिपीतून दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या पणत्या

swarit