HW News Marathi
महाराष्ट्र

कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कंगनाने दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. त्यामुळे कंगनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच पालिकेनं कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती.

 

कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयालर पालिकेनं आज (९ सप्टेंबर) सकाळी कारवाई सुरू केली. अवैध बांधकाम प्रकरणी बजावण्यात आलेल्या नोटिशीला २४ तास उलटून गेल्यानं पालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. कंगनाच्या वकिलांकडून कारवाईला आक्षेप घेण्यात आला. पालिकेची कारवाई चुकीची असल्याचं म्हणत त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर झालेल्या सुनावणीत कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. कंगणासाठी हा मोठा दिलासा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC परिक्षेबाबत मुख्यमंत्री स्वत: पत्रकार परिषद घेणार – विजय वडेट्टीवार

News Desk

“आमच्यामध्ये थोडीशी नव्हे… तसूभरही चर्चा नाही”, खातेवाटप प्रश्नावर अजित पवारांचा टोला

News Desk

Live Update : पुढची रणनीती सविस्तर चर्चेनंतर ठरविणार | महाआघाडी

News Desk