HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जास्त काय सुरू ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे ‘हे’ पर्याय!

मुंबई | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नेमकं होणार कसं हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे राज्यातील मंत्री कोरोनाबाधित होत आहेत. अशा वेळी मुंबईत होणाऱ्या अधिवेशनाला येणारे लोकप्रतिनिधी त्यांचा स्टाफ, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यांना कोरोनाची बाधा होऊ नये हे मोठे आव्हान असणार आहे.

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं चालवायचं याबाबत एक पर्याय समोर आला आहे. या पर्यायानुसार विधिमंडळाचे अधिवेशन दीर्घकाळही चालवता येऊ शकतं. विधानभवनात झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाने हा पर्याय मांडल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे आरोग्य विभागाचा पर्याय?

– या पर्यायानुसार अधिवेशनाचे कामकाज जर जास्त दिवस चालवायचे असेल तर एक आठवड्यात चार दिवस कामकाज करायचे आणि त्यानंतर तीन दिवस सुट्टी द्यायची हा फॉर्म्युला सुचवण्यात आला आहे.

– यानुसार चार दिवस कामकाजात जर कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला तर तो नंतरच्या तीन दिवसात लक्षणे दिसून येतील. त्यामुळे पुढच्या आठवड्यात कामकाजाआधी पुन्हा चाचणी केल्यास कोणी कोरोनाबाधित असेल तर ते स्पष्ट होईल.

– अशा पद्धतीने आठवड्यातून चार दिवस कामकाज, तीन दिवस सुट्टी या फॉर्म्युल्यानुसार तीन ते चार आठवडे अधिवेशन चालवता येईल. या पर्यायाची चर्चा मात्र अजून झाली नाही. येत्या 25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

– दुसरीकडे विधानपरिषदचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी जास्तीत जास्त आमदारांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता यावं म्हणून अधिवेशनाआधी सगळ्यांना लस उपलब्ध करुन द्यावी यासाठी सरकारला पत्र लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स!

News Desk

शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले म्हणजे ते अजित पवारांनी फोडले असं होत नाही

News Desk

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्यस्तरावरुन अधिकचा निधी उपलब्ध करुन घेण्यास पाठपुरावा करणार! – सतेज पाटील

Aprna