HW News Marathi
महाराष्ट्र

CBI चौकशी करून मास्टरमाईंड शोधून काढा – संभाजी ब्रिगेड डॉ. शिवानंद भानुसे

मुंबई.भीमा कोरेगाव प्रकरणाची संपूर्ण चौकशी CBI मार्फत करून मास्टर माईंड शोधून काढा अशी मागणी महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड चे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांच्या सह प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

डॉ. भानुसे म्हणाले की, भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाला २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो बहुजन बांधव तेथे एकत्र झालेले होते. त्याठिकाणी काही विकृत प्रवृत्तीच्या काही समाज कंठकांनी अनेक दिवसांपासून जाणीवपूर्वक षडयंत्र रचून १ जानेवारीच्या कार्यक्रमावर जो हल्ला केला, शेड पाडले. त्यांचा संभाजी ब्रिगेड जाहीर निषेध करीत आहे. तसेच दलित, मराठा व सर्वच बहुजन समाज बांधवांना अशी विनंती केली आहे की, सर्वांनी एकत्रितपणे या विकृत घटनेचा शांतपणे निषेध करावा. तसेच या घटनेमागे जो मास्टरमाईंड आहे त्याचा पोलिसांनी आधी शोध घेऊन त्याचे नाव जनतेसमोर जाहीर करावे. या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी. त्यामुळे दोन समाजात विनाकारण निर्माण होणार गैरसमज व अफवा थांबतील. आपण सर्व परिवर्तनवादी लोकांनी शांत डोक्याने व नियोजनपूर्वक या प्रसंगाचा सामना करायचा आहे. त्यामुळे कोणीही भडकावू वक्तभ करू नये. चुकीची कृती करू नये. शांतता राखावी आणि जो दोन समाजात तेड निर्माण करीत आहे. त्या मास्टरमाईंडला शोधून काढण्यासाठी लक्ष केंद्रीत करावे व शांतता राखावी असे आवाहन महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड चे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही,’ अशोक चव्हाण

News Desk

‘माध्यमांवर दबाव तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

News Desk

एसटी संपात उद्धव यांची उडी

News Desk