HW News Marathi
महाराष्ट्र

आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने थकवले पाण्याचे २३३ कोटींच बिल

मुंबई | काही दिवसांपूर्वी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहीतीनुसार महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांच्या बंगल्यावर तब्बल ८ कोटी रुपयाची थकबाकी असल्याचे समोर आले होत. त्यावरनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्टिकरणही देण्यात आले होते. तर आता रेल्वे प्रशासनाने मुंबई महापालिकेच तब्बल २३३ कोटी ९० लाख ९६२ रुपयांचे पाण्याचे बिल थकवले असल्याची माहीती समोर आली आहे. माहीतीच्या अधिकारातूनच ही बाब उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते असलेले शकिल अहमद शेख यांनी महापालिकेला पाण्याच्या थकबाकीदारांची माहीती मागितली होती. त्या माहितीतूनच ही बाब उघड झाली आहे.

शकिल अहमद शेख यांनी जनमाहीती अधिकारी आणि कार्यकारी अभियंता जलमापके यांच्याकडे ही माहिती मागितली होती. ज्यामधून स्पष्ट झाले आहे की, मध्य रेल्वेच्या ६७ जलजोडण्या आहे. तर पश्चिम रेल्वेच्या ५५ जलजोडण्यांचा यामध्ये समावेश आहे. यापैकी पश्चिम रेल्वेकडे १३० कोटी ७२ लाख ३६ हजार ८३८ रुपयांची थकबाकी आहे. तर मध्य रेल्वेकडे १०३ कोटी १८ लाख ५६ हजार १२४ रुपयांची थकबाकी आहे. यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मिळून एकूण २३३ कोटी ९० लाख ९२ हजार ९६२ रुपयांचे पाण्याचे बिल थकविण्यात आले आहे. यामुळे महापालिकेकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण १२२ जलजोडण्यांना डिफॉल्टर यादीमध्ये टाकण्यात आले आहे. आधी मंत्र्यांच्या बंगल्यांचे बिल आणि आता रेल्वे विभागाचे बिल अशी कोटींची बिल थकविण्यात आले आहे. यापैकी विविध मंत्र्यांच्या बंगल्याचे पाण्याचे बिल थकित असल्याची बातमी आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व थकित बिलाची रक्कम भरण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांनी राजभवनाच्या बाहेर येत राजकारण करावे – संजय राऊत

News Desk

पत्नी रुग्णालयात, मुलगा कोरोनाशी झगडतोय..ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायत,उद्धव ठाकरे होणं अवघडं!

News Desk

आता मुंबईच्या डबेवाल्यांनाही हक्काची घरे मिळणार

swarit