HW Marathi
HW एक्सक्लुसिव महाराष्ट्र राजकारण

HwExclusive | ‘शरद पवारांची राष्ट्रवादीवर पकड राहिलीचं नाही’!

पुणे | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (५ एप्रिल) आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. देशमुखांनी १०० कोटी रुपये वसूल करणयास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. या सगळ्या पार्श्वभूमिवर अखेर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून करण्यात आली होतीच. याच मुद्द्यावर एच.डब्ल्यू  मराठीच्या आमच्या सहाय्यक संपादक आरती मोरे पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केली.

अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला असं सांगितलं. यावर चंद्रकांत पाटील असं म्हणाले की, “नैतिकतेच्या मुद्यावर जर राजीनामा द्यायचा होता तर परमबीर सिंग यांनी ज्यादिवशी आऱोप केला त्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. जो बूंद से गयी वो हौद से नही आती. लोकांमध्ये हा मेसेज गेला की तुम्ही प्रकरण कोणंतही असो रेटता. त्यानंतर लोकांचं किंवा कोर्टाचं प्रेशर आलं की राजीनामा देता. संजय राठोड प्रकरणातही तेच झालं. एवढीच जर तुमच्यात नीतीमत्तेची जाण आहे तर पूजा चव्हाण आत्महत्येनंतर लगेच ऑडियो क्लिप बाहेर आल्या. तुम्ही असं म्हणाला नाहीत की चौकशी नंतर बघू आधी राजीनामा द्या. त्यामुळे आधी राजीनामा द्यायला वेळ लागला नंतर खिशात ठेवलेला राजीनामा द्यायला वेळ लागला, असा खरमरीत समाचार चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारचा घेतला. तुम्हाला जोपर्यंत रट्टा बसत नाही तोपर्यंत तुम्ही काही करत नाही”.

पुढे त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, “महाविकासआघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. मात्र, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला. तर कुठे करी शरद पवार यांची राष्ट्रवादीवरील पकड कमी झाली आहे का?”. यावर चंद्रकांत पाटील एच.डब्ल्यू मराठीशी बोलताना म्हणाले की, “राष्ट्रवादीचे आधीही २ नेते अशा प्रकरणात अडकले आहेत. एक ज्यांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली (जितेंद्र आव्हाड) आणि दुसरे आहेत त्यांचे (नवाब मलिक) जावई ड्रग्सच्या प्रकरणात अडकले आहेत. अशी राष्ट्रवादीची यादी छोटी नाही मोठी आहे. परंतू, असा प्रकरणामध्ये एकूणच शरद पवारांची जी संवेदनशीलता होती. त्यांनी कितीही राजकारण केलं तरी अन्याय कधी त्यांनी सहन केला नाही. धनंजय मुंडे आणि अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या वेळेला त्यांची पक्षावरील पकड ढिली होत चालली आहे. पण शरद पवारांची पक्षावरील पकड ढिली झाली पण उद्धव ठाकरेंवरची पकड काही ढिली झाली नाही”, असं म्हणत त्यांनी सूचक भाष्य केले आहे.

 

Related posts

भगीरथ भारतनाना भालके विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे !

News Desk

आज विधानसभा निवडणुकीची होणार घोषणा, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

News Desk

हनुमान हे खेळाडू होते !

News Desk