HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला नवा मंत्र

सांगली | चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात एक वकिलांची फौज तयार करा. हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जीवावर सुरू आहे. मुंबईमध्ये एक अदृश्य वकिलांची टीम काम करत आहे. त्यामुळे सरकारमधील लोक घाबरले आहेत. त्यांना कळेनासे झालं आहे. कायद्याचा दबाव सुरू करा. केसेस जास्तीत जास्त दाखल झाल्याने त्याचे राजकारणातले कॅरेक्टर सर्टिफिकेट तयार होते. गेल्या २२ महिन्यात आम्ही त्यांना कोर्टात एकही केस जिंकू दिली नाही. हे तीन पक्ष शेवटचा प्रयोग म्हणून तडफड करत आहेत. कोणीतरी सल्लागार चुकीचा असल्याने ते सर्व ठिकाणी कोर्टात मारच खाणार आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.

सरकार केवळ पोलीस आणि गुंडांच्या बळावरच चाललं आहे

‘सत्तेतील तीन पक्ष आणि त्यांचा शिरोमणी संजय राऊत हे खोटे बोल पण रेटून बोल, असा इको दररोज तयार करत असतात. त्यासाठी आता भाजपही त्यांच्या इकोला सडेतोड असा इको तयार करत आहे. सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आक्रमक व्हावे लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे लक्षात ठेवावं,’ असा कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. सांगली येथे शुक्रवारी भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.हे सरकार केवळ पोलीस आणि गुंडांच्या बळावरच चाललं आहे, अशी बोचरी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

राज्यात जिथे जिथे भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात, त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उलटे गुन्हे, तक्रारी दाखल कराव्यात, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. नाशिकमधील प्रकरणानंतर सामनाच्या संपादकांवर चार तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर संजय राऊत यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. असा उलटा दबाव तयार करावा लागणार, असं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा; कठोर कारवाई न करण्याचे राज्य सरकारला आदेश

News Desk

‘आमदार आहात. किमान नागरिकशास्त्र वाचा’, यशवंत जाधवांचा आशिष शेलारांना टोला

News Desk

खडवलीमध्ये अडकलेल्या २५ जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप सुटका

News Desk