HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याच्या उद्योजकाच्या पुढाकारातून सिंगापूरहून येणार ३५०० व्हेंटीलेटर्स

पुणे | राज्यात कोरोनाच्या संकटामुळे ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटीलेटर्स या सगळ्याची कमतरता भासत आहे. अशा काळात अनेक जण मदतीला धावून आले आहेत. कोणी हॉस्पिटल उभारत आहे तर कोणी ऑक्सिजन उपलब्ध करुन देत आहेत. अशात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिंगापूरमधून पुण्यातील उद्योजक सुधीर मेहता यांच्या सहकार्याने आठ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि साडेतीन हजार व्हेंटीलेटर एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोष्टी भारतात आणण्यासाठी परवानगी दिली असल्याचेही पाटील यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

“सुधीर मेहता हे जिल्ह्यामधील आरोग्य व्यवस्था अपग्रेट करण्यासाठी इतर व्यवसायिकांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी मागील वर्षभरामध्ये जवळजवळ २०० कोटी उभे केलेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मला सांगितलं की सिंगापूरमध्ये काही आरोग्य विषय साहित्य उपलब्ध आहे. यामध्ये त्यांना ८००० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि साडेतीन हजार व्हेंटीलेटर असल्याचं सांगितलं”.

“सिंगापूर सरकारचा एक कॉर्पोस फंड आहे. जो जगातील सर्वात मोठ्या चॅरीटी फंडपैकी एक आहे. याअंतर्गत सिंगापूर सरकारने मेहतांना ऑफर दिली की ५० टक्के रकमेमध्ये आम्ही तुम्हाला हे देतो. न्यायची व्यवस्था करा असं मेहतांना सांगण्यात आलं, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.

यासंदर्भात मेहता यांनी चंद्रकांत पाटील यांना तर त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. “माझ्याकडे हा विषय आला. मी मोदीजींना पत्र लिहिलं. केंद्र सरकारने विमानाने या गोष्टी आणण्याची तयारी दर्शवली आहे. कालच मोदी आणि एअर इंडियाच्या प्रमुखांचं बोलणं झालं आहे. एअर इंडियाच्या माध्यमातून या गोष्टी एअरलिफ्ट केल्या जाणार आहेत ,” असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

“हे सर्व साहित्य भारतात आल्यानंतर ४००० हजार कॉन्सन्ट्रेटर्स भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील भाजपा अध्यक्षाच्या माध्यमातून दहा याप्रमाणे वितरित करायचे आणि त्याची बँक निर्माण करायची”, अशी योजना असल्याचं पाटील म्हणाले आहेत.

औरंगाबादमधून १२ ऑक्सिजनच्या प्लॅण्टमधून त्यांनी ऑक्सिजन विकत घेतला आहे. ते आता वेगवेगळ्या रुग्णालयांना ते देणार आहेत. एका ऑक्सिजन प्लॅण्टमधून २०० जणांना म्हणजेच २४ जणांना ऑक्सिजन देण्याची सोय महेतांनी केली आहे. मेहतांनी आणलेले ऑक्सिजन प्लॅण्ट रुग्णालयांमध्येच उभे करावे लागणार असून त्यासाठी २०-२२ दिवस लागतात. त्यामुळे ही सेवा लवकरच उपलब्ध होईल अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद वापरून आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करतायत !

News Desk

याकुब मेननच्या घरात बीएमसी घुसली नाही मात्र कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केली – आशिष शेलार

News Desk

वाहन चालविण्याची लायसन्स आता मिळणार ऑनलाईन! – अनिल परब

Aprna