HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजीराजेंना मान्य नसले तरी ऑन पेपर ते भाजप खासदारच!

सांगली | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप खासदार संभाजीराजे यांच्यात खडसे उडताना दिसत आहेत. आज (१२ जून) सांगलीत बोलत असताना पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना खासदारकीवरुन टोला लगावला आहे. संभाजीराजे छत्रपती हे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजपचेच खासदार आहेत, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संभाजीराजे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार आहेत. मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

यावेळी पाटलांनी संभाजीराजे यांच्या आंदोलनाविषयीच्या भूमिकेवर थेट बोट ठेवले. संभाजीराजे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भाषा करतात. मात्र, लोकप्रतिनिधींना जाब विचारुन हा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तुम्ही मराठा आरक्षणासाठी वाट बघणार आहात की वाट लागण्याची वाट पाहणार आहात. या विषयात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आंदोलनात कोणी चाल ढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता संभाजीराजे यावर काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले होते?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 16 तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे संभाजीराजे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा आमदार आणि खासदार मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णायक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात चालढकल केली तर मराठा समाजाचं नुकसान, सरकारला पळवाट देऊ नका’ – चंद्रकांत पाटील

संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ती गोष्ट ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. मात्र, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. संभाजीराजे यांनी चालढकल केली तर भाजप जो कोणी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुढाकार घेईल, त्याच्या पाठिशी उभा राहील, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

काल कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना संभाजीराजे राज्य सरकारला वेळ देत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मराठा मोर्चा काढण्यात चालढकल झाली तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. त्यानंतर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कोणाकडे जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही. मात्र, वेळ निघून गेल्यास मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी तर मिळणार नाही ना, याचा विचार संभाजीराजे यांनी केला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना जामीन मंजूर

Aprna

राज्यपालांनी खडसेंचे कौतुक केले कारण…

News Desk

यंदाची कोजागिरी पौर्णिमा सर्वांच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो – अजित पवार

News Desk