HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘मी आता संजय राऊतांवर पुस्तकचं लिहिणार!’ चंद्रकांत पाटलांकडुन खिल्ली

पुणे | देशात आणि महाराष्ट्रात कोरोनापरिस्थीती अधिक बिकट होत चालली आहे.या परिस्थितीत सध्या राज्यात मात्र विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात जुंपलेली पाहायला मिळत आहे.सातत्याने एकमेकांवर टिका टिप्पणा करण्यात राज्यकर्ते व्यस्त आहेत.शरद पवारांवर पीएचडी,अजित पवारांवर एम.फिल आणि आता संजय राऊतांवर थेट आपण पुस्तकचं लिहिणार आहेत असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी पुण्यात केले आहे.

संजय राऊत वर्णन करण्यापलिकडचे ! पुस्तकचं लिहणारे आता

पुण्यात पंडित दिनदयाळ शाळेत करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी आज चंद्रकात पाटील आले होते.यावेळी माध्यमांनी त्यांना संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला.सध्या देशातील कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संसदेचं २ दिवसांचं अधिवेशन बोलवण्यात याव अशी मागणी संजय राऊतांनी केली.यावर बोलताना चंद्रकात पाटील म्हणाले,संजय राऊतांवर आता मी पुस्तक लिहिणार आहे ,ते वर्णन करण्यापलीकडचं व्यक्तीमत्व आहे.त्यांनी मागणी करावी आणि मोदींनी ती मान्य करावी मी काय सांगणार ? त्यामुळे आता संजय राऊत यावर काय बोलतात हे पाहावं लागेल.

महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन बोलवा !

दुसरीकडे चंद्रकात पाटलांनी आता विधानसभेचं अधिवेशन बोलवण्याची मागणी केलेली आहे .ते म्हणतात , महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. यावेळी सरकारने सर्व पारदर्शक परिस्थिती जनतेसमोर मांडावी, यासाठी तातडीने विधानसभा सत्राचे आयोजन करून सर्व आमदारांच्या समोर राज्यसरकारने सत्य परिस्थिती मांडावी, अशी मी मागणी करतो.

Related posts

माझगाव आगीतून तिरंगा सुरक्षित खाली उतवणाऱ्या कुणाल जाधवांचा मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार

rasika shinde

कोरोनावर मात केल्यानंतर राजीव सातव यांची प्रकृती खालावली, न्युमोनियाचा झाला संसर्ग

News Desk

जनतेशी संवादच न राहिल्यानं सरकारवर संवादयात्रेची वेळ – खा. अशोक चव्हाण

News Desk