Site icon HW News Marathi

चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई | चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपचे (BJP) नवे प्रदेशाध्यक्ष निवड झाली आहे. तर मुंबई अध्यक्ष पदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली. यानंतर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाले होते. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षच्या रेसमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, राम शिंदे यांची नावे होती.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलार यांच्या मुंबई अध्यक्ष नियुक्तीचे पत्र काढले आहे. राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या सहीचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही नागपूरचे आहेत. ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना 2019 विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले होते. परंतु, चंद्रशेखर बावनकुळेंना विधानपरिषदेतून आमदारकी दिली. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद दिले.

दरम्यान, मंगलप्रभात लोढा हे आधी मुंबई अध्यक्ष होते. परंतु, मंगलप्रभात लोढा यांची देखील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे मुंबई अध्यक्ष पद रिक्त झाले होते. यानंतर पुन्हा एकदा आशिष शेलार यांची मुंबईच्या अध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.

 

Exit mobile version