HW News Marathi
महाराष्ट्र

योगी आदित्यनाथ बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत – चंद्रकांत पाटील  

कोल्हापूर | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (२ डिसेंबर) मुंबईत येणार आहेत. मुंबईतील फिल्म सिटी उत्तर प्रदेशात नेण्यासाठी बैठक घेण्याकरता ते येणार आहेत. यावरुन राजकीय वातावरणात गोंधळ सुरु झाला आहे. “मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत,” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“बॉलिवूड किंवा असा कोणत्याही उद्योग ज्यामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्माण होतो, तो कुठेही नेण्याचं कारण नाही. एखाद्यावेळी ते अशाच प्रकारचा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा यासाठी अभ्यासासाठी येत असावेत,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.“पण मुंबईतून बॉलिवूड ते नेऊ शकत नाही. तसेच मुंबईतील सुविधा इतर ठिकाणी मिळणं फार अवघड आहे. पण सुविधा उपलब्ध करुन एखादी पर्यायी सुविधा उपलब्ध केली तर काही आक्षेप असण्याचं कारण नाही,” असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे आघाडी सरकारही या मुद्याच्या विरोधात आहे.

योगी आदित्यनाथ उद्या मुंबईत येणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (२ डिसेंबर) रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील. ते १ डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचतील. त्यानंतर २ डिसेंबरला ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. यावेळी योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे ते आवाहन करतील. रतन टाटा, आदित्य बिरला असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होणार आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉलिवुड ड्रग्स प्रकरण : अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबी कार्यालयात दाखल 

News Desk

“मुख्यमंत्री WorkFromHome करू शकतात, सामान्यांना मात्र…”, भाजपचा खोचक टोला!

News Desk

महाराष्ट्र हा XXची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही! – संजय राऊत

Aprna