HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार सर्वोच्च नेते, त्यांची कोणाला ॲलर्जी असण्याचं कारण नाही – छगन भुजबळ

नाशिक | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्दयावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी अखेरपर्यंत एकजुटी दाखवली आणि त्यामुळे सरकारला मिळणाऱ्या महसूलात घट झाली. त्यामुळेच शरद पवारांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी जाहीरपणे चर्चा करायला भाग पाडले, असे वक्तव्य पडळकरांनी केले. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पडळकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवारांची कोणाला ॲलर्जी असण्याचं कारण नाही. ते केवळ महाराष्ट्राचेच नाहीतर संपूर्ण देशातील एक असे नेते आहेत, ज्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत आहे. त्याचबरोबर राज्यातीलसंपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावणे ही महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे. तसेच शरद पवार हे महाविकास आघाडीतील एका पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळेच शरद पवारांनी कर्मचाऱ्यांचा संप सोडवण्यासाठी पुढाकार घेतला, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे.

शरद पवारांना हक्क आहे

भुजबळ म्हणाले, राज्यातील एसटी कामगारांच्या संपाचा प्रश्न गेल्या दोन महिन्यांपासून सुटलेला नाही. त्यामुळे शरद पवारांना कामगारांची काळजी वाटणे साहजिकच आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार किंवा मी, आम्ही दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील गिरणी कामगारांचा संप पाहिला आहे. अद्याप गिरणी कामगारांचा संप संपला, असं कोणी जाहीर केलेलं नाही. मिलमधील लोक देशोधडीला लागले. त्यामुळे एसटी संपाबाबत एवढा अट्टाहास करणं योग्य नाही. तसेच एसटी कामगारांना समजावण्याचा आणि राज्यकर्ते चुकत असतील तर त्यांना मार्गदर्शन करण्याचा हक्कही शरद पवारांना आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंमत आहे का दंगल करण्याची? इथे ठाकरे सरकार आहे; संजय राऊतांचा इशारा

News Desk

“एक आदर्श गृहमंत्री म्हणुन आबानंतर त्यांच्याकडे पाहिले गेले”, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

News Desk

महत्त्वाच्या शासकीय संस्थांना सुरक्षा पुरवा

News Desk