HW News Marathi
महाराष्ट्र

छगन भुजबळांच्या शिवसेनाप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम ?

नाशिक | राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमधील शिवसैनिकांच्या छगन भुजबळ यांच्या शिवसेनाप्रवेशाला विरोध असल्याने त्यांनी केलेल्या मागणीनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भुजबळांना शिवसेनेत घेणार नसल्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (२४ ऑगस्ट) मुंबईत मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी, “छगन भुजबळ हे ते येवला आणि नांदगावमधील जागा वाचवू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते शिवसेनेत येत असून त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये”, अशी मागणी शिवसैनिकांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यामुळे, छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नसल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळते.

विखेंना घेतले पण छगन भुजबळांना भाजपमध्ये घेणार नाही !

काहीच दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाबाबत एक वक्तव्य केले होते. “विधानसभेच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेकांना भाजपमध्ये यायचे आहे. अन्य पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या जरी जास्त असली तरीही आमचा पक्ष ‘आओ जाओ घर तुम्हारा’ नाही. आम्ही अगदी पारखून मोजक्याच जणांना आमच्या पक्षात घेत आहोत. उदाहरण द्यायचे झाले तर आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेतले. कारण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. मात्र, छगन भुजबळ यांना घेणार नाही”, चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालिका आणि बेबी पॅंग्विनच्या कामाबद्दल बोलणारे सेलिब्रिटी पावसाबद्दल काही बोलणार का? नितेश राणेंनी धरलं धारेवर

News Desk

मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी म्हणजे कोणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय कळेल !

News Desk

महाराष्ट्रात कोरोना स्टेज २, कोरोनाग्रतांची संख्या ३९ वर

swarit