HW News Marathi
महाराष्ट्र

‘पाण्याची वर्षा बिलाचे अवर्षण’, राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांवर व्यंगचित्रातून टीका

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या बंगल्याला मुंबई महानगरपालिकेने डिफॉल्टर घोषित केले आहे. वर्षा बंगल्याचे जवळपास साडेसात लाख रुपयांचे पाणी बिल थकित असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे हे प्रकरण प्रकाशात आले. त्यात ही माहिती उजेडात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने यावरून मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडविणारे व्यंगचित्र काढले आहे.

राष्ट्रवादीने हे व्यंगचित्र त्यांच्या पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. या व्यंगचित्रामध्ये मुख्यमंत्री टप बाथमध्ये अंघोळ करत आहेत तर दुसरीकडे टपबाथमध्ये पाणी वाया जात असल्याचे पाहायला मिळत आहे. वाया जात असलेल्या पाण्यात बीएमसी मंत्र्यांची थकीत बाकी हातात घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. या व्यंगचित्राला ‘पाण्याची वर्षा बिलाचे अवर्षण’ अशी कॅप्शन देऊन खिल्ली उडवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाण्याचे थकित बिल ७.५ लाख अशी माहिती देखील व्यंगचित्रामध्ये देण्यात आली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चित्रपटगृहे, सांस्कृतिक केंद्रे पूर्ण क्षमेतेने सुरु करण्यास परवानगी”- अजित पवार

News Desk

आज विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार, राज्यातील जनतेच्या वाटेला काय येणार?

Aprna

मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांना निलंबित करा, भाजप आमदाराचे थेट पंतप्रधानांना पत्र

News Desk