Site icon HW News Marathi

शिंदे सरकार लोणार सरोवराचे जतन, संवर्धन आणि विकास करणार

मुंबई | लोणार सरोवराचा (lonar sarovar) पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) मंजुरी देण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने आज (27 जुलै) घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोणार सरोवराच्या विकासाला मंजूरी दिली.  याआधी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार सरोवरला भेट देऊन विकाससाठी 200 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु, महाविकास आघाडी सरकारनंतर राज्यात शिंदे सरकार स्थानप झाले.

यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. या कामांची विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये लोणार सरोवर परिसरात मंदिराचे जतन, निसर्ग पर्यटन, वन्यजीव संरक्षण, सरोवराभोवती पदपथ, रस्त्यांचे भूसंपादन, अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन अशी विविध कामे केली जातील.

नियोजन विभागाने मंजूर आराखड्यातील कामनिहाय आवश्यक निधी लोणार सरोवर विकास समितीकरिता पीएलए खाते तयार करुन त्यामध्ये वर्ग करण्यात येईल. तथापि, ज्या विभागांना राज्याच्या अर्थसंकल्पाव्यतिरिक्त इतर स्त्रोतातून निधी प्राप्त होतो ज्याची तरतूद नियोजन विभागामार्फत करणे शक्य नाही तसेच तांत्रिक कारणामुळे निधी लोणार सरोवर विकास समितीकडे वर्ग करण्याची बाब शक्य नसल्यास, अशा प्रकरणी संबंधित विभागाने आराखड्यातील कामे प्रचलित पद्धतीनुसार समितीच्या देखरेखीखाली करण्यात येईल.

 

Exit mobile version