Site icon HW News Marathi

पारस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून 4 लाखांची मदत जाहीर

मुंबई | अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींवर शासकीय खर्चाने व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत ७ भाविक ठार तर २३ जण जखमी झाले आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोर धरला. यामुळे अकोल्यातील पारस गाव येथे बाबाबुजी महाराज संस्थानात सभामंडपाच्या शेडवर जुने निंबाचे मोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 7-8 जण जखमी असून या शेखाडील 20 ते 23 जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

 

Exit mobile version