Site icon HW News Marathi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन

औरंगाबाद । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे (State Level Agriculture Festivals) रविवारी (१ जानेवारी) उद्घाटन झाले.

या प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली तसेच शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या नव्या प्रयोगांचे कौतुकही केले.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

विशेष सहभाग

Exit mobile version