Site icon HW News Marathi

राज्याच्या विकासाचा पुनश्च ‘श्री गणेश’ करण्याचा संकल्प करू! – मुख्यमंत्री

मुंबई | ” महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्री गणेश करण्याचा आपण संकल्प करू या”, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) शुभेच्छा दिल्या.  राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शिंदे कुटुंबाने सहकुटुंब बाप्पाची आरती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

 

मुख्यमंत्री म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या गणरायाचे घराघरात आगमन होते. गणरायाच्या कृपेने दोन वर्षापासून कायम असलेले कोरोनाचे संकट अखेर दूर झाले आहे. यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्सहात, जल्लोषात आणि  निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करतोय. गणेशाचे हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्ध आणि समाधान घेऊन येऊ अशी प्रार्थना मी श्री चरणी करतो.”

 

विकासाचा पुनश्च श्री गणेश करण्याचा आपण संकल्प करू 

लाडक्या गणरायाचा उत्सव साजरा करताना. महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्री गणेश करण्याचा आपण संकल्प करू या. त्यासाठी आपण सर्व जण एकजुटीने आणि कोणत्याही आवाहनाची परवा न करता, सर्वांनी मिळून प्रयत्न करू या. उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपने देखील जास्त महत्वाचे आहे. आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी, अशी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

 

 

 

 

Exit mobile version