HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रीपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत यांचा उद्धव ठाकरेंसोबत वाद ?

मुंबई | महाविकासआघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला आहे. मात्र, ठाकरे सरकारच्या विस्तारानंतर तिन्ही पक्षांर्गत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. यात शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सावंतांचा रोषपाहून त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत त्यांना निरोप दिला, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. या प्रकारामुळे ठाकरे आणि सावंत यांच्यातील अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे.

ठाकरे आणि सावंत यांच्यातील ताणवामागे वादग्रस्त पार्श्वभूमी आहे. ती म्हणजे शिवसेना-भजप यांच्या युती सरकारमध्ये सावंत हे जलसंधारण मंत्री होते. यावेळी रत्नागिरीतील तिवरे धरण फुटल्याची मोठी घटना घडली. यात अनेक शेतकरी वाहून गेली, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले होते. यावेळी खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण फुटल्याची अजब प्रतिक्रिया सावंत यांनी त्यावेळी दिली होती. या वक्तव्यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले होते. या व्यतिरिक्त महाराष्ट्राला भिकेला लावेल, असे वक्तव्यही सावंत यांनी केले होते. त्यावरुनही विरोधकांनी शिवसेनेवर मोठी टीका केली होती. या संपूर्ण प्रकारामुळे महाविकासआघाडी सरकारच्या विस्तारात सावंतांची संधी हुकल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तानाजी सावंता मंत्री पदासाठी कार्यकर्त्या दंडवत घालणार

तानाजी सावंत यांना मंत्रिपदासाठी मिळण्यासाठी सोलपूर जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत सोलापूर शहरासह बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा आदी तालुक्यातील कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते. सावंतांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी शिवसैनिक आग्रही झाले आहेत. यासाठी सोलापूरमधील शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री बार्शीतील शिवसैनिक दंडवत घालणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथील शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळ शिवतीर्थपासून ते मातोश्रीपर्यंत महिला आघाडीच्या कार्यकर्त्या दंडवत घालणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी अजित पवार नंतर शरद पवांरांना भेटले धनंजय मुंडे!

News Desk

मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार | मुख्यमंत्री

News Desk

तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोतांचा पवारांना सवाल!

News Desk