Site icon HW News Marathi

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत

मुंबई | मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत दु:ख आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे  काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात, असे निर्देशही दिले आहेत. कुर्ला येथील नाईक नगर परिसरातील मध्य रात्री चार मजली इमारत कोसळली. ही इमारत काल (२७ जून) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही इमारत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अजूनही काही जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी महानगरपालिका, अग्निशमन दल आणि एनडीआरफ पथकाच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातील माहिती कुडाळकर यांनी ट्वीट करत दिली आहे. कुडाळकर ट्वीटमध्ये म्हणाले, “दुःखद घटना नाईक नगर, कुर्ला (पू) येथे चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. अग्निशामक , महानगरपालिका , पोलिस यंत्रणा बचाव कार्य सुरू आहे. कुटुंबियांना 1 लाख व मृत व्यक्तींना 5 लाख मा मंत्री एकनाथ शिंदे , आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे करण्यात येईल.”

संबंधित बातम्या
कुर्ला परिसरातील चार मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली लोक अडकले

 

 

 

Exit mobile version