HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार पंतप्रधानांशी चर्चा!

मुंबई। कोरोनामुळे आधीच भयावह परिस्थिती झाली होती. त्यामुळे लॉकडाऊन मुळे सगळीकडे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि हळूहळू जनजीवन सुरळीत पूर्वपदावर येत असतांनाच अश्यातच आता ओमिक्रॉनमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याने अनेक देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओमिक्रॉनवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यात निर्बंध लावावे की लावू नये? नवी नियमावली काय असेल? यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी अस स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी काय नियमावली असावी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच पंतप्रधानांशी बोलणार असल्याचं आता स्पष्ट करण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करण्याची सूचना केली

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तब्बल एक तास ही बैठक सुरू होती. नव्या व्हेरियंटबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. या बाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावेळी सर्वच मंत्र्यांनी नव्या नियमावलीबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करण्याची सूचना केली. मुख्यमंत्र्यांनीही ही सूचना मान्य केली असून ते लवकरच नरेंद्र मोदींशी या विषयावर चर्चा करणार आहेत.

सर्जिकल मास्क वापरा

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यासोबत झालेल्या या चर्चेतून आरोग्य विभागाचे अधिकारी, टास्क फोर्सचे अधिकारी, राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी यांची या विषयी दोन तासांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यात

नवीन व्हेरीयंट बाबत माहिती दिली. त्याचे स्वरूप काय, त्याच्या संसर्गाची गती पाचपट आहे, त्याची म्युटेशन जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटना याचा अभ्यास करते आहे की त्याची दाहकता किती आहे, अशा अनेक बाबी आहेत या सर्वांचा अभ्यास चालू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचे ठरवले असून कापडी मास्क वापरण्यापेक्षा सर्जिकल मास्क वापरा अशी माहिती या बैठकीनंतर सांगण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पुजा चव्हाण’ची आत्महत्या की घातपात ?, एका मंत्र्याचा संबंध असल्याच्या रंगल्या चर्चा

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर परिवहन महामंडळाचा धक्कादायक निर्णय

News Desk

‘कोकणात कायमची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याचा मानस’, वीजवाहिन्या भूमिगत करणार विजय वडेट्टीवार!

News Desk