HW News Marathi
महाराष्ट्र

…तर मला राऊतांनी जोड्याने मारावे! – किरीट सोमय्या

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबागमध्ये १९ बंगले असून त्यांनी १९ घरांचा टॅक्स भरला आहे. तर मनिषा रविंद्र वायकर या देखील टॅक्स भरला आहे. जर बंगले रश्मी ठाकरेंच्या नावे नाहीत तर मग तुम्ही टॅक्स कशाला भरता ?, असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांच्यावर काल (१५ फेब्रुवारी) आरोप केले होते. यानंतर सोमय्यांनी आज (१६ फेब्रुवारी) दिल्लीतून घेऊन राऊतांच्या आरोपाचे खंडण केले आहे.

सोमय्या म्हटले, “अन्वय नाईक यांनी २००८ मध्ये बंगले बांधले होते, असे रेकॉर्डमध्ये आहे. तर २००९ पासून ठाकरेंनी बंगल्याचे कर भरले जात आहे. तसेच १ एप्रिल ते २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत १९ कोलराई ग्रामपंचायतला टॅक्स भरले. पण, ११ नोव्हेंबर २०२० ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या जमिनीचे व्यवसाय मी उघड केले होते. रश्मी ठकारे आणि मनिषा यांनी जर टॅक्स भरला नाही, असे लिहून द्यावे. आणि यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. मला जोड्याने मारू म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे पुरावे पहावे, तपासाने आणि मग हवे असेल तर मला जोड्याने मारावे, असे म्हणाले. 

राऊतांचे सोमय्यांवर केलेले आरोप

राऊतांनी काल पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांवर आरोप केले होते. नील सोमय्यांची ‘निकॉन इन्फ्रा कन्सट्रक्शन’ ही कंपनी असून वसईतील गोखिवरे येथे मोठा प्रकल्प राबवत आहे. तर पीएमसी बँक घोटाळ्यातील राकेश वाधवानशी त्यांचा संबंध आहे. राऊतांनी दलाल’ ‘भडवा’ XXX- संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा वादग्रस्त उल्लेख केला आहे. माझं ‘त्या दलाला’ आव्हान, आपण सगळे ४ बसेस करू आणि आपण ‘त्या’ १९ बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ, आणि जर तुम्हाला ते १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन, आणि जर दिसले नाहीत तर त्या दलाला जोड्याने मारू”, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

Aprna

भाजपची चौथी यादी, विनोद तावडेंचा पत्ता कट, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसेंना उमेदवारी

News Desk

“…मी दुसरी शिवसेना मानत नाही”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Aprna