HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याचे मुख्यमंत्री लवकरच बदलणार

मुंबई – नेमस्तपणे राज्याचा कारभार हाताळणाऱ्या स्वच्छ चारित्र्याच्या मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच केंद्रात बोलाविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. त्यामुळे रिकाम्या होणाऱ्या मुख्यमंत्रीपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे. तसेच राज्याच्या एकंदर मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. मात्र याबाबत भाजपाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात गृहनिर्माण मंत्र्यांवर आणि उद्योगमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत, असे भाजपातील सूत्रांनी सांगितले.

केंद्रात दीड वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेचा भाजपाला उपयोग होऊ शकतो, हे लक्षात घेता त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा यासाठी विचार करण्यात येत आहे, असे कळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खरा मास्टरमाईंड सुनिल पाटील, नवाब मलिकांवर षडयंत्राचा मोहित कंबोज यांचा आरोप

News Desk

‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले – सत्यजीत तांबे

News Desk

शरद पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ पुण्यात उद्या आंदोलन

News Desk