HW News Marathi
महाराष्ट्र

चित्रा वाघ म्हणतात रावणाला मदत करणारी शुर्पणखा, आता चाकणकरांकडून उत्तर!

मुंबई। चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना रावणाला मदत करणारी शुर्पणखा,अशी टीका केळी होती. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्बत झाल्याचा बातम्या आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन चाकणकरांवर बोचरी टीका केली. आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना यावरूनच उत्तर दिलं आहे.“माझ्या नावावर शिक्कामोर्तब वगैरे अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून ऐकते आहे. माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही. राष्ट्रवादी महिला संघटनेचं उत्तम काम सुरु आहे. मी समाधानी आहे. इच्छा वगैरे असा काही विषय नाही. चित्राताईंच्या ट्विटवर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही”, असं रुपाली चाकणकर यांनी एका माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही

महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी तुमचं नाव निश्चित झालंय का?, असा प्रश्न tv 9 ने विचारल्यावर त्या म्हणाल्या, “ज्या गोष्टीची मला काहीच कल्पना नाही, त्यावर मला काही बोलायचं नाही. माझ्या नावावर शिक्कामोर्तब वगैरे अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून ऐकते आहे. माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही. राष्ट्रवादी महिला संघटनेचं उत्तम काम सुरु आहे. मी समाधानी आहे. इच्छा वगैरे असा काही विषय नाही” अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

तरी त्यांचा रोख चाकणकरांकडे आहे, हे स्पष्टच

महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, असा हल्ला चढवत जर चाकणकरांची निवड झाली तर प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये चाकणकरांचं नाव घेतलेलं नाही. पण रात्रीपासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरांची निवड निश्चित झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे जरी चित्रा वाघ यांनी नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख चाकणकरांकडे आहे, हे स्पष्ट आहे.

अनेकवेळा चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये खडाजंगी

धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख प्रकरणात भाजपने केलेल्या आरोपांना रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर देत पक्षातील नेत्यांसाठी बॅटिंग केली होती. आरोप होत असतात, चौकशी होते आणि दोषी असेल तर न्यायालय शिक्षा देतं, तुम्ही त्यांना अगोदरच दोषी का ठरवताय? असे सवाल चाकणकर सातत्याने भाजप नेत्यांना विचारत राहिल्या. अनेकवेळा चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये याच प्रकरणांवरुन खडाजंगीही झाली. आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांचं नाव चर्चेत येताच किंबहुना अधिकृत घोषणेच्या शक्यतेअगोदरच चित्रा वाघ यांनी चाकणकरांवर घणाघाती हल्ला चढवून दोघींमधल्या वादाच्या पुढच्या अंकाची कशी सुरुवात होणार आहे, याची झलक दाखवून दिलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

News Desk

राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून आता शुद्धीकरण!

News Desk

ठाकरे सरकारचा विधानसभेत आज पुन्हा असंविधानिक निर्णय

Aprna