HW News Marathi
महाराष्ट्र

“मोदी गुजरात दौऱ्यावर, फडणवीस कोकण दौऱ्यावर; मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा”

मुंबई | गेल्या तीन दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढलं आहे. गुजरातला जाण्याआधी त्या वादळाने महाराष्ट्रात धुमाकुळ घातला होता. दरम्यान, महाराष्ट्रात रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना या वादळाचा मोठा फटका बसला. त्यानंतर गुजरातला या वादळाने झोडपून काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातचा हवाई पाहणी दौरा करणार आहेत. तसेच तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

चित्रा वाघ यांचे ट्विट काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. तौक्ते वादळाने झालेलं नुकसान, त्यासाठीची मदत व सर्वात महत्वाचे लोकांना आधार देण्यासाठी पंतप्रधान गुजरातमध्ये आहेत. तर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे कोकणात पोहोचलेत. मग, मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहात किमान मुंबईत तरी दौरा करा, असा टोला चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आलं मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत. महाराष्ट्रातही तौक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग, महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत, असा सवाल नवाब मलिक यांनी ट्विट करुन उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानतंर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रभाकर साहिलच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता; सीआयडी चौकशी करा! – महेश तपासे

Aprna

संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा; नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्रं!

News Desk

शिवसेनेने सरकारमध्ये राहून विरोधी पक्षासारखे वागू नये, सरकार स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त भाजपची भूमिका

News Desk