HW News Marathi
महाराष्ट्र

गोंदिया जिल्ह्यात महिलेवरील घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

मुंबई | गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पिडीत महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

भंडारा तालुक्यातील ही महिला पतीपासून वेगळी राहत होती. अलीकडे ती आपल्या बहीणीकडे वास्तव्यास होती. मात्र, बहिणीसोबत वाद झाल्याने पीडित महिला 30 जुलै रोजी रात्रीच आपल्या आईकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली. यावेळी एका अज्ञात व्यक्तीनं तिला सोडण्याच्या बहाण्यानं त्याच्या कारमध्ये बसवलं आणि तिला घरी न सोडता एका जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर दुसऱ्या दिवशी (31 जुलै) देखील त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानं तिथून पळ काढला.

यानंतर पीडिता कशीबशी त्या जंगलातून कान्हळमोह येथील धर्मा ढाब्यावर पोहोचली. पण आगीतून फोफाट्यात अशी तिची गत झाली. ढाब्यावर या पीडित महिलेने ज्यांची मदत मागितली त्या आरोपींनी सुद्धा तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने महिलेला दुचाकीवरून शेतात घेऊन गेले व तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी कारधा पोलिसांनी दोन संशयितांना अटक करून गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावच्या कोठडीत ठेवले आहे. तर दुसरीकडे, पीडित महिलेची प्रकृती आता धोक्याबाहेर असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घराला घरपण देणाऱ्या डिएसकेंचे तुरुंगातील फोटो व्हायरल

News Desk

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक, काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर 

News Desk

‘संयम सोडू नका’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्यापाऱ्यांना आवाहन!

News Desk