HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी महाडमधील बचाव कार्याचा आढावा घेतला!

मुंबई | कोकणात आलेली पूर परिस्थितीने सगळेच हादरले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(२३ जुलै) या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

बचाव कार्य तैनात

चिपळुणात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी बचाव कार्य तैनात आहे. रेस्क्यू कार्य सुरूही झालेलं आहे. बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी ओसरलं आहे पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. माणगाव पाचाड मार्गे महाड रस्ता, माणगाव महाड महामार्ग, गोरेगाव दापोली रस्ता सुरु झाला आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी दिली आहे.

संस्थान कडून मदतीचाच हाथ

चिपळुणात पडत असेलल्या पावसामुळे वीज खंडित केली आहे. पुरात अडकलेल्या लोकांना अन्न, पाणी याची सोय नसल्यामुळे माणगाव येथे सुमारे 2000 फुड पॉकेट्स तयार आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत अजून 2000 अन्नाची पाकिटे तयार होतील. याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत. माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना झाले आहे. स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात राहावे व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी, असे आवाहन केल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाल्या आहेत.

आरोग्य यंत्रणा सज्ज

एकीकडे कोरोनाचं संकट असताना नागरिकांना आता पुराचा सामना करायला लागत आहे. महाड मधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाटू लोणेरे येथे एक वैद्यकीय पथक सज्ज असून त्यांच्याकडे रुग्णवाहिका व इतर सामुग्री आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. एमआयडीसी चे अग्निशामक दल देखील मदत कार्यात उतरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केसरकरांचा राणेंना इशारा,”…तर आम्ही मागे-पुढं पाहणार नाही”

News Desk

आमचे खत चांगले आहे, महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार !

News Desk

राणा दाम्पत्य उद्या ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचण्यासाठी जाणारच!

Aprna