HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन’

मुंबई | राज्यात आज(१० सप्टेंबर) सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे क्षण शेअर केले आहेत.

गणपती बाप्पा मोरया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. यावेळी त्यांनी सहकुटुंब बाप्पाचं स्वागत केलं आहे. त्यांच्या पूजेचा फोटो ट्विटर शेअर केला आहे. “गणपती बाप्पा मोरया” म्हणत त्यांनी लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आहे.

पंतप्रधानांकडून मराठीमधून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नाणेंद्र मोदींकडून भारतवासीयांना आज(१० सप्टेंबर) मराठी मधून गणेशोत्सवाच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. या काळात कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. मात्र, असं असलं तरीही गणेशभक्तांच्या मनातला उत्साह मोठा आहे. पुढचे १० दिवस हा उत्साह असाच कायम राहणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलदायी झालं आहे. याच पार्श्वभूमीवर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे ट्विट?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ““आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!”, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. दरम्यान, महाराष्ट्राबरोबरच देशभरात विविध ठिकाणी गणेशभक्तांकडून मोठ्या उत्साहात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, बोरिवली, विरार यासारख्या मुंबईच्या लगतच्या उपगरांमध्ये सकाळपासूनच आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सर्वांचीच लगबग दिसून आली आहे.

राज्य सरकारचा नेमका निर्णय काय?

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’, नितेश राणेंचे सूचक वक्तव्य

News Desk

उद्या होणारा दसरा मेळावा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा – पंकजा मुंडे

News Desk

फडणवीसांची ओबीसी आरक्षणाची मागणी आणि अजित पवारांनी लगेचच बोलावली बैठक

News Desk