HW News Marathi
महाराष्ट्र

‘मूड ऑफ दी नेशन’च्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टॉप फाईव्हमध्ये स्थान पटकावले !

मुंबई | २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर अचानक उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीनंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून तयार झालेले महाविकास आघाडीचे सरकार प्रस्थापित झाले. तर, मुख्यमंत्री पदाची धुरा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाती घेतली. कोरोना महामारी, निसर्ग चक्रीवादळ यासोबतच विरोधकांच्या आव्हानाला सामोरे जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत टॉप फाईव्हमध्ये स्थान पटकावले.

तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला क्रमांक पटकावून देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे. ‘मूड ऑफ दी नेशन’ असे या सर्वेक्षणाचे नाव आहे. या सर्वेक्षणादरम्यान, देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ग्रामीण व शहरी भागांतील मते नोंदवण्यात आली. त्यानुसार, जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत उद्धव ठाकरेंची लोकप्रियता वाढल्याचे दिसत आहे. त्यानुसार ७ टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंच्या कामाला चांगली पसंती दिली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकाचे, तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी ११ टक्कयांसह तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी व नितीशकुमार यांची जानेवारीच्या तुलनेत लोकप्रियता घातल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ९ टक्यांसह बॅनर्जी या चौथ्या, तर उद्धव ठाकरे व नितीश कुमार हे प्रत्येकी ७ टक्यांसह सयुंक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर मुलाने मुलासारखे वागले पाहिजे !

News Desk

देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा इतकेच आम्ही सुचवू शकतो !

swarit

जाणून घ्या…मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने कोणकोणते घेतले निर्णय

News Desk