HW News Marathi
देश / विदेश

वर्ल्ड कप टी २० चं समालोचन आता मराठीत; मनसेचा दणका

मुंबई | महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे समीकरण गेली अनेक वर्ष जपणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पुन्हा एकदा आपला मनसे इंपॅक्ट दाखवला आहे. नुकतीच IPL २०२१ संपली आणि याचे समालोचन (Commentary) इतर भाषांसोबत मराठीत व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी हॉटस्टार सोबत पत्रव्यवहार करत IPL चे समालोचन मराठीत करावं याची मागणी धरून ठेवली होती. त्यानंतर हॉटस्टारने आता झालेल्या सामन्यांचं समालोचन मराठीत केलं आहे.

वर्ल्ड कप टी २०चं समालोचन मराठीत व्हावं अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र, हॉटस्टारने या वर्षी ही मागणी पूर्ण होऊ शकणार नसल्याची माहिती ट्विट करत दिली होती. परंतु, त्यानंतर आता हॉटस्टारने आता सुरु होणारी वर्ल्ड कप मॅच आणि त्याचे समालोचन मराठीत करणार असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील मॅचपासून वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे आणि याच मॅचपासून मराठीतून समालोचन होणार आहे.

मराठी Commentry चा हट्ट का?

मराठी Commentry चा इतका हट्ट का? याला उत्तर देताना केतन नाईक म्हणतात कि, “विषय नुसता समालोचनाचा नसून त्यातून निर्माण होत असलेल्या अर्थकारणमुळे मराठी भाषेतील जाणकारांना रोजगार मिळणार असेल तर तो आम्हाला हवा आहे आणि अशाच प्रकारचं काम राज ठाकरे त्यांना अपेक्षित असतं”, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरपीएफ जवानाने लहान मुलाचे प्राण वाचवले

swarit

स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत राहणार का? काय म्हणाले नाना पटोले वाचा

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या

News Desk