HW News Marathi
महाराष्ट्र

आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, संजय निरुपम यांचा इशारा 

मुंबई | औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावर कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण करुन दिल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसची नाराजी समोर आली आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे असे त्यांनी म्हटले आहे.

संजय निरुपम यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. युतीचे सरकार हे वैयक्तिक अजेंड्यावर नव्हे कॉमन मिनिमम प्रोगामच्या आधारे चालते. हा कॉमन मिनिमम प्रोगाम काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असा टोला संजय निरुपम यांनी शिवसेनेला लगावला. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून निरुपमांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

https://twitter.com/sanjaynirupam/status/1345242156089311234?s=20नाव बदल हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील – बाळासाहेब थोरात

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असं थोरात म्हणाले. औरंगाबादच्या नामकरणाचा वाद पुन्हा एकदा पुढं आला असताना बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवई पेरूबाग पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे ३०० ते ४०० कोटींचा घोटाळा; राऊतांचा सोमय्यांवर गंभीर आरोप

Aprna

‘पर्यावरण बचाना अपने हाथ में है भिडू’, जॅकी श्रॉफ यांनी राजभवनावर घेतली राज्यपालांची भेट

Manasi Devkar

नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन!

News Desk