HW News Marathi
महाराष्ट्र

…तोपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही ! – नाना पटोले

मुंबई । “केंद्रातील भाजपच्या सरकारने अन्नदात्याची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासनं दिली पण सत्तेत येतात भाजपचं सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं. तीन काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना संपवण्याचं षडयंत्र आखलं होतं. त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं. शेवटी कायदे मागे घेत असल्याची घोषणा सरकारला करावी लागली. पण या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही म्हणून जोपर्यंत संसदेत तीन काळे कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा फुलप्रुफ कायदा सरकार आणत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही”, असं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, “काळ्या कायद्यांविरोधातील लढाईत शेतकऱ्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे. वर्षभर हा संघर्ष चालला त्यात ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला. शेतकऱ्यांवर मोदी सरकारने प्रचंड अत्याचार केले. लाल किल्ल्याचे प्रकरण पुढे करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तर लखमीपूर खेरीमध्ये मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकरी व एका पत्रकराला गाडीखाली चिरडून मारलं. त्या मंत्र्यांची हकालपट्टी अजून झालेली नाही, ती झाली पाहिजे. देश व लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई सुरु आहे.”

भाजप हा शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष!

संबंधित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक म्हणाले की, शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींना मागे हटवण्यास प्रवृत्त करुन कायदे रद्द करण्यास भाग पाडलं पण त्यासाठी ७०० शेतकऱ्यांना प्राण गमवावं लागलं. पण उत्तर प्रदेश पंजाबमधील आगामी निवडणुकीत भाजप हारणार असं दिसत असल्यामुळे मोदींनी हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तरी शेतकऱ्याच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. एमएसपीचा कायदा बनवला पाहिजे, शेतकऱ्यांना स्वस्त वीज मिळाली पाहिजे आणि आंदोलनादरम्यान मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत या त्यांच्या मागण्या आहेत. त्या सरकारने मान्य कराव्यात. भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नाही तो शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष आहे.”

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्राने २७ व २८ नोव्हेंबर या कालावधीत शहीद किसान अस्थिकलश मानवंदना आणि संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचं आयोजन केलं होतं. यासंदर्भातील आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक, डाव्या पक्षाचे प्रकाश रेड्डी, काँग्रसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, भाकपा, माकप, जनता दल, समाजवादी पक्ष व इतर समविचारी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पडळकरांना आमदारकी फक्त पवारांवर टीका करण्यासाठी दिली”, रोहित पवारांनी दिलं जशास तसं उत्तर

News Desk

काँग्रेस पक्षाच्या प्रचार मोहिमेचा ४ फेब्रुवारीला उस्मानाबाद जिल्ह्यातून शुभारंभ

News Desk

“लोकलने लोकं प्रवास करतात, वरळीत पब सुरु असतो मग परीक्षा पण झाल्याच असत्या”, भाजपचा टोला

News Desk