HW News Marathi
देश / विदेश

राऊत – शेलार भेटीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ! नाना पटोले म्हणाले…

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीने शनिवारी (३ जुलै) याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान, संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात नेमकी कोणत्या कारणास्तव चर्चा झाली ? हा मुद्दा अद्याप अनुत्तरितच असताना या दोन्ही नेत्यांच्या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता या राऊत – शेलार भेटीवर काँग्रेसकडून पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. “आम्ही या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहत नाही”, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. सोबतच , “भाजपचे नेते भविष्यवाले आहेत”, असा टोलाही नाना पटोलेंनी लगावला आहे.

संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्या भेटीबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्र हे असे राज्य आहे जिथे कोणी कोणालाही भेटू शकतो. इथे सर्व नेत्यांनी एकमेकांसोबत काम केलेले आहे. त्यांची मैत्रीसुद्धा आहे. ते एकमेकांना कधीही भेटू शकतात. म्हणून आम्ही या भेटीला राजकीय भेट असे गृहीत धरत नाही”, तसेच “भाजपचे नेते भविष्यवाले आहेत. मी भविष्यवाला नाही”, असेही म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सर्वांच्या कोरोना चाचणीनंतर विधानसभा अध्यक्षाबाबत निर्णय

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत बोलताना यावेळी नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याला वाटते की विधानसभा अध्यक्षाची निवड लवकर व्हावी. त्यामुळे उद्या सर्वांच्या कोरोना चाचणीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. अध्यक्षपदासाठी सर्व आमदारांमध्ये चर्चा केली जाईल. त्यानंतर ते नाव पुन्हा हायकमांडकडे पाठवले जाईल. आमच्या पक्षात लोकशाही आहे. भाजपसारखी ठोकशाही नाही”, असे म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा भाजपला टोला लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान अतिदक्षतेचा इशारा

News Desk

प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

Aprna

#Article370Abolished LIVE : मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, कलम ३७० अंशत: रद्द

News Desk