Site icon HW News Marathi

‘भारत जोडो यात्रे’दरम्यान काँग्रेसच्या सेवादलाचे नेते कृष्ण कुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई | काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सोमवारी महाराष्ट्रात दाखल झालेली आहे. या यात्रेदरम्यान काँग्रेस नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे. पांडे यांच्या वयाच्या 62 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

नांदेड येथे भारत जोडो यात्रेमध्ये झेंडा तुकडीचे पांडे हे संचलन करत केले. यावेळी पांडेंना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर पांडेंना तात्काळ रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यात आले. यानंतर कळाले की पांडेंना हृदयविकाराचा झटका आला होता. यात पांडेंचे दु:खद निधन झाले. यानंतर कॅम्पमधील  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच. के. पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली वाहली.

गेल्या दोन महिन्यापासून भारत जोडो यात्रा सुरू असून ही यात्रा सोमवारी (7 नोव्हेंबर) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रा ही तेलंगणामार्गे नांदेडच्या देगलूरमध्ये दाखल झाली. यातवेळी राहुल गांधी यांनी हातात मशाल घेत महाराष्ट्रात प्रवेश केला. राहुल गांधीसोबतत हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रात यात्रेला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्रात ही यात्रा 14 दिवस असणार आहे. या दारम्यान राहुल गांधी अनेक कार्यक्रम, सभा आणि चौकातील सभांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात आल्यानंतर राहुल गांधींनी नगर परिषदेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

संबंधित बातम्या

राहुल गांधी हातात मशाल घेऊन महाराष्ट्रात दाखल; आज ‘भारत जोडो यात्रे’चा असा आहे प्रवास

 

Exit mobile version