HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे राज्यव्यापी ‘जीवनदान महाअभियान’ रक्तदान शिबिर ! | बाळासाहेब थोरात

मुंबई | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ६ डिसेंबर रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यव्यापी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. ६ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावाधीत राज्यभरातून २५ हजार पिशव्या रक्त संकलन करण्याचे उदिष्ट्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताध्यक्ष तथा महलूसमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

थोरात म्हणाले की, राज्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून फक्त आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रदेश काँग्रेसने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यभरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हा तसेच ब्लॉक स्तरावर रक्तदान शिबीरे आयोजित करुन जास्तीत जास्त पिशव्या रक्त संकलन करावे, असे थोरात यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून टीका करत असतात, गृहमंत्र्यांचा टोला

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा, सदाभाऊ खोत घटनास्थळी, पोलिसांकडून अडवणूक

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्यासंदर्भात पक्षात दोन मतप्रवाह, शरद पवारांचे मोठे विधान

Aprna