HW News Marathi
महाराष्ट्र

ओबीसींच्या विरोधातील षडयंत्र खपवून घेतलं जाणार नाही! पंकजा मुंडेंचा इशारा

“राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं आहे. त्यामुळे, या निवडणुकीत अन्याय झाला. पण आगामी निवडणुकीत पुन्हा असाच अन्याय होता कामा नये. म्हणूनच निवडणुकीपूर्वी हे आरक्षण पूर्ववत करावं”, अशी मागणी करत ओबीसींच्या विरोधातील कोणतंही षडयंत्र खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज (१२ ऑक्टोबर) औरंगाबादमध्ये दिला. भाजपाच्यावतीने ओबीसी जागर अभियानांतर्गत औरंगाबादमध्ये श्रीहरी पॅव्हेलियन, दर्गा रोड येथे पार पडलेल्या विभागीय मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या.
“राज्य सरकारने ओबीसी बांधवांवर मोठा अन्याय केला आहे. या अन्यायाचा संघर्ष बुथ स्तरापर्यंत घेऊन जा. संघर्षाची वज्रमुठ तयार ठेवा”, असं आवाहन यावेळी पंकजा मुंडेंनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे. “वंचित घटकांना न्याय देण्यासाठी त्यांना सत्तेत बसवणं हे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या राजकारणाचं मुळ होतं. एक पिता व नेता म्हणून त्यांचा मला नेहमीच अभिमान वाटला. छत्रपती शिवराय, शाहू- फुले- आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात दुर्दैवाने अजूनही जातीच्या भिंती संपुष्टात आल्या नाहीत. ओबीसींची परवड का होतेय? जाती-पातीच्या नावावर गावागावांत शेतकऱ्यांवर, महिलांवर अन्याय, अत्याचार का होतात? राज्य सरकार याकडे लक्ष देणार आहे की नाही?”, असे सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केले.

“ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही रोज उठताबसता जात काढत होता, त्यानेच…”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत पंकजा मुंडेंनी चक्क देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे. “ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही रोज उठताबसता जात काढत होता. त्याच मुख्यमंत्र्यांने मराठा समाजाला आरक्षण दिलं”, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. दरम्यान, पंकजा यांच्या या विधानामुळे पंकजा आणि फडणवीस यांच्यातील वाद शमल्याचं म्हटलं जात आहे.

“उद्धवजी, अध्यादेश टिकवून दाखवाच”

“आम्ही सत्तेत असताना ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पण महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ते रद्द झालं. ओबीसींवर आरक्षणाची टांगती तलवार ठेवू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मी तुम्हाला आव्हान देते की, कोर्टात अध्यादेश टिकवून दाखवा आम्ही तुमचं कौतुकच करू”, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री ज्या चुका केल्या त्या विरोधी पक्षनेते म्हणून तरी करू नयेत!

News Desk

जलनायक निवडीसाठी 24 एप्रिलपर्यंत अर्ज करा

News Desk

दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – धनंजय मुंडे

News Desk