HW Marathi
कोरोना देश / विदेश मंत्रिमंडळ महाराष्ट्र राजकारण

कोरोना नियमाचे पालन करून राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी

मुंबई | कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु सुरु होणार आहे. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर काही इयत्ता, वर्ग सुरु झाले होते. पण दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा वर्ग बंद झाले होते. दरम्यान, बहुतांश ठिकाणी लसीकरण झाले आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

शाळा उघडण्याचे स्वागत

4 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य भीतीमुळे सरकारने घेतलेला निर्णय मागे घेतला होता. परंतु गणेशोत्सव होऊनही धोका जाणवत नाही पासपोर्टचा तो निर्णय कसा वादग्रस्त ठरला होता परंतु हरकत नाही. दिवाळीनंतर शाळा उघडण्यापेक्षा अगोदरच सरकार शाळा उघडते आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे.

त्यामुळे शाळेच्या प्रवाहात मुलांना टिकवणे म्हणजे बालमजुरी रोखणे शाळेत मुले आणणे म्हणजे शालाबाह्य होण्यापासून रोखणे व मुलगी शाळेत आणणे म्हणजे तिला बालविवाह पासून रोखणे हाच एकमेव कार्यक्रम आता करावा लागेल आणि त्यामध्ये या निर्णयाचे नक्कीच स्वागत आहे. दरम्यान लहान मुलांची शाळा उघडताना मग आता महाविद्यालयांचे काय? ते अगोदर उघडली पाहिजे, असा सवालही हेरंब कुलकर्णी यांनी केला.

Related posts

अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल

News Desk

मला पाडून दाखवा ,अजित पवारांचं मुनगंटीवारांना चॅलेंज !

News Desk

दक्षिण आशियामध्ये नेतृत्व निर्माण करण्यासाठी अल कायदा प्रयत्नशील

News Desk