HW News Marathi
Covid-19

पुढील काळातील लॉकडाऊनमधली आव्हाने, अर्थचक्र गतिमान करणे यावर मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

मुंबई | राज्यात कोरोनाची स्थिती चिंतादायक आहे. अशातच राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा आज (१५ मे) मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे, आणि शरद पवार यांनी काही ठराविक नेत्यांसमवेत घेतला. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या सगळ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

बैठकीत केंद्र शासनाने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज, राज्यातील आरोग्य यंत्रणेची स्थिती, कायदा सुव्यवस्था, स्थलांतरीत मजूरांच्या समस्या, रोजगार आणि उद्योग अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच, शरद पवारांनी धोरणात्मक दिशा ठरवण्याबाबतही चर्चा विमर्श केला. दरम्यान, या बैठकीच्या वेळी सर्व नेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले होते.

गेल्या सुमारे ५५ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसायांना सुरु करण्यात आले होते. ६५ हजार उद्योगांना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून ३५ हजार उद्योग सुरु झाले आहेत तसेच ९ लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले.

परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु असून पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु आहे.उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर ५० टक्के पर्यंत वाढला गेला आहे. तसेच परार्ज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला आहे अशी माहितीही देण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला रेमडेसीवीर देण्यास केंद्राची बंदी ! राष्ट्रवादीचा केंद्राला सज्जड इशारा

News Desk

HW Exclusive : लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक !

News Desk

राज्याला दिलासा ! नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला

News Desk