HW News Marathi
Covid-19

कोरोनाची लक्षणे नसलेल्या मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात घेऊ नका – आरोग्यमंत्री

मुंबई | राज्यात सध्या कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे आणि त्यामुळे त्यांना बेड्सची कमतरता पडत आहे. त्यामुळे ज्या लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे रुग्णही पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात भरती होत असल्याने गरजू रुग्णांना खाटा मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयाने भरती करुन घेऊ नये, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

कोरोनाचा थेट रिपोर्ट रुग्णांना दिला तर कोणतीही लक्षणे नसलेले लोकं तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात जाऊन दाखल होतात. त्यामुळे ऑक्सिजन आणि आयसीयूची गरज असणाऱ्या रुग्णांना जागा मिळत नाहीत. खासगी रुग्णालये लक्षणे नसलेल्या लोकांना दाखल करून घेतात आणि पैसे कमावतात. ज्या रुग्णांना खरंच बेडची गरज आहे, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे असे राजेश टोप यांनी सांगितले. सर्व रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेचे विशेष अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटीने मोफत घरी सोडणार

News Desk

ठाकरे सरकारने आज घेतले ३ अत्यंत महत्त्वाचे निर्णय

News Desk

ठाकरे सरकारचा कारभारच बघायला मिळाला नाही, राज ठाकरेंचा टोला

News Desk