HW News Marathi
Covid-19

आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात ! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार राज्यव्यापी लसीकरणाचा शुभारंभ

मुंबई । संपूर्ण वर्षभर कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा दिल्यानंतर आता अखेर देशवासियांना काहीसा दिलासा मिळणार असून कोरोना लसीची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आजपासून (१६ जानेवारी) लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज राज्यव्यापी लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) कोविड केअर सेंटरमध्ये या लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. राज्यात आज पहिल्याच दिवशी तब्बल २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा. देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. त्याचप्रमाणे, पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विलेपार्लेतील कुपर रुग्णालयात लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करतील. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने एकत्रितपणे तयार केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लशी देशातील कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.

मुंबईत लसीकरणासाठी एकूण ९ केंद्र

मुंबईत एकूण ९ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. मुंबई महानगरपालिकेला सीरमच्या ‘कोविशील्ड’ या लसीचे तब्बल १ लाख ३९ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत.तर महानगरपालिकेकडे १ लाख ३० हजार इतकी लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. दरम्यान, मुंबईत सुरवातीला दररोज सरासरी ४ हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

पुण्याचाही मास्टरप्लॅन तयार

पुण्यातही आज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या दरम्यान लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. एकूण ८ केंद्रावर लसीकरण पार पडणार आहे. दिवसाला प्रत्येक केंद्रावर १०० नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस मिळणार असून आतापर्यंत पुण्यातील एकूण ५५ हजार वैद्यकीय सेवकांची नोंदणी या लसीकरणासाठी झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राममंदिर भूमिपूजनादिवशी राज्यातील मंदिरे उघडणार ?

News Desk

Pravin Darekar HW Exclusive : उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत !

News Desk

मीरा- भाईंदर, ठाणेमध्ये पुन्हा लॉकडाऊन!

News Desk