HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाची लागण झाल्यास त्याची व्याप्ती वाढू शकते मात्र घाबरण्याचे कारण नाही !

मुंबई | महाराष्ट्रातही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली असून पुण्यातील दाम्पत्याला लागण झाल्यानंतर पुण्यातील आणि राज्यातील प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत. पुण्यातील कोरोनाची लागण झालेल्या दाम्पपत्याला ज्या टॅक्सी चालकाने सोडले त्यालाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय पातळीवर अथक प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली आहे.

पुण्यातील त्या दाम्पत्याला आणि टॅक्सी ड्रायव्हरला कोरोना असल्याचे स्पष्ट होताच त्याच्या गाडीत जे जे प्रवासी बसले त्या सगळ्यांच्या शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून आज (११ मार्च) त्यांना लागण झाली आहे की नाही याचा अहवाल हाती येईल. आणि जर त्यांना लागण झाली असेल तर त्याची व्याप्ती वाढू शकते मात्र घाबरण्याचे कारण नाही, तर काळजी घेणे गरजेचे आहे. असे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाबाधित आणि संशयित अशांना पुण्यातील नायडू रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली, तरी ती बरी होऊ शकते. कोरोना ८० टक्के सौम्य स्वरुपाचा आहे. त्यानंतर १० ते १५ टक्के गंभीर, तर ५ टक्के अतिगंभीर स्वरुपाचा असतो. यामध्ये २ ते ५ टक्के मृत्यूदर आहे. सगळ्यांनी काळजी घ्या. चिकन-मटण खाऊ नये अशा ज्या अफवा पसरल्या आहेत त्या खोट्या आहेत. तुम्हाला जे काही खायचे आहे ते व्यवस्थित शिजवून खाल्ले पाहिजे. विशिष्ट उच्च तापमानावर कोरोनाचे विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. कोरोना व्हायरसचा इन्क्यूबेशन पिरेड हा किमान १४ दिवसांपासून २८ दिवसांपर्यत इनक्यूबेशन असतो, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजचे निधी वितरण लवकरात लवकर करा, अजित पवारांचे निर्देश

News Desk

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अजित पवार सभागृहात आक्रमक; म्हणाले…  

Aprna

“हॅलो, अजित पवार बोलतोय…”, आमदार निलेश लंकेंना अजित पवारांनी फोन करत दिला मोलाचा सल्ला

News Desk