HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड-१९ चाचणी आणि उपचार सरकारी रुग्णालयातच होणार

मुंबईत | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ५०० च्या पुढे गेला आहे. दरम्यान, १८ जणांनी कोरोनामूळे प्राण गमावले आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कोविड-१९ ची लक्षणे आढळलेल्या ६० वर्षांवरील रुग्णांवर महापालिका, राज्य सरकार आणि खासगी अशा मोठ्या रुग्णालयांतच उपचार करण्यात येणार आहेत. ६० वर्षांखालील आणि कोविड-१९ ची कोणतीही लक्षमे नसलेल्या रुग्णांवर मॅटरनिटी होम, गेस्ट हाऊस अशा विविध ठिकाणी सुरु केलेल्या विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यासाठी प्रशासनाने कार्यपद्धती तयार केली आहे. तसेच, या संदर्भातील परिपत्रकही मुंबई महानगरपालिकेकडून काढण्यात आले आहे.

कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्यांपैकी बहुसंख्य रुग्ण हे ६० वर्षांवरील असून या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब यांसरखे इतरही आजार असल्याने मृत्यूची संख्या अधिक आहे. यामुळे या रुग्णांची विशेष काळजी घेता यावी म्हणून सर्व सोयी असलेल्या कस्तुरबा, सेंट जॉर्ज, सेव्हन हिल, नानावटी, सैफी या रुग्णालयातच या रुग्णांवर उपचार करण्याचे एसओपीमध्ये सांगण्यात आले आहे. आणि ज्यांना कोविड-१९ ची ल७मे नसतील अशा रूग्णांवर मॅटरनिटी होम बिल्डिंग नागपाडा, लिलावती हॉस्पिटलजवळचे मॅटरनिटी होम, अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्ट हाऊस, डायग्नोस्टिक सेंटर पंजाबी गल्ली, एमसीएमसीआर पवई, अर्बन हेल्थ सेंटर शिवाजी नगर, वांद्रे तलावासमोरील महात्मा गांधी हॉल या ठिकाणी उपचाराकरिता विलगीकरण (आयसोलेशन) सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’वर उदयनराजे भोसले आज भूमिका मांडणार

News Desk

Jayant Patil HW Exclusive : भाजपच्या नेते मंडळींना ‘कोरोना’पेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते !

News Desk

सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे! – चंद्रकांत पाटील

Aprna