HW News Marathi
महाराष्ट्र

कामं होत नसतील तर दंगा करा ! मंत्री यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

मुंबई | राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या एका अजब सल्ल्याची आता चांगलीच चर्चा रंगत आहे. “कामं होतं नसतील तर दंगा करा”, असा सल्ला यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. तर “शासकीय कार्यालयात जाताना ४-५ जणांना सोबत घेऊनच जा”, असे बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (८ ऑगस्ट) सोलापूरमध्ये झालेल्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज्याच्या या मंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हे सल्ले दिले आहेत.

कामं होत नसतील तर दंगा करा !

सोलापुरात झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या तरीही काम होत नसल्याचे त्यापैकी एका कार्यकर्त्याने यावेळी सांगितले. त्यावर उत्तर देताना मंत्री यशोमती ठाकूर असे म्हणाल्या कि, “कामं होत नसतील तर दंगा करा. भीक मागितली तर कोणी देत नाही. अधिकार हे आपल्याला हिसकावून घ्यावे लागतात. कोणत्याही तालुका अध्यक्षाने अशी तक्रार करायची नाही. तुम्हाला तालुका अध्यक्ष केलंय म्हणजे तुमचा तालुका तुम्हीच सांभाळला पाहिजे. त्याला बळ देण्याचं काम आम्ही करु”,असे विधान यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

शासकीय कार्यालयात जाताना 2-4 जण या बाजूला, 2-4 जण दुसऱ्या बाजूला घेऊनच जा !

“आम्ही इतके जिल्हे फिरलो मात्र अशी तक्रार पहिल्यांदाच ऐकली. आपलं कुठतरी चुकतंय, हे लक्षात घ्या. आपला धाक हा असला पाहिजे. चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यावर आपला धाक असला पाहिजे. आपण कार्यकर्ते म्हणून जाताना जरा एकजुटीने गेलं पाहिजे. शासकीय कार्यालयात जाताना 2-4 जण या बाजूला, 2-4 जण दुसऱ्या बाजूला घेऊन गेलो की मग सर्वकाही व्यवस्थित होत”, असा बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजीनाम्या पेक्षा आत्मपरिक्षण करा-ना.धनंजय मुंडे

News Desk

लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे भाजपने रणसिंग फुंकले

News Desk

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत येणारे कल्याणराव काळे आहेत कोण?

News Desk