HW News Marathi
महाराष्ट्र

क्राइम ब्रांच यूनिट 11 ची उल्लेखनीय कामगिरी; लक्ष विचलित करून, बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

मुंबई | क्राइम ब्रांच यूनिट ११ ने लक्ष विचलित करून, बॅग लिफ्टिंग करणाऱ्या पाच आरोपींची टोळी प्रमुखासह पकडून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. तब्बल ४,४८,७०० रुपयाची मालमत्ता चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. दिंडोशी पोलीस ठाण्यात दोन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पहिल्या गुन्ह्यात ३,५०,००० रुपयांची मालमत्तेची चोरी तर दुसऱ्या गुन्ह्यात ९८,७०० रुपये इतक्या मालमत्तेची चोरी झाल्याचा प्रकार घडला होत. रिजवान शफी मुजावर ऊर्फ चाचा वय 47 वर्ष. मोहम्मद फहीम शाहीद खान वय 32 वर्ष. राकेशकुमार रामराज यादव ऊर्फ चक्की वय 31 वर्ष. हद्दपार केलेला विशाल अशोक शर्मा ऊर्फ लालु वय 39 वर्ष. हद्दपार केलेला अख्तर अन्वर शेख वय 32 वर्ष असे अटक केलेल्या ५ आरोपींची नावे आहेत.

दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅन्केतुन रोख रक्कम काढून जाणाऱ्या इसमांवर नजर ठेऊन, त्यांचा पाठलाग करून, त्यांच्या जवळ गर्दी करून, रक्कम असणाऱ्या व्यक्तीचे लक्ष विचलित करून त्याच्या जवळ असलेल्या रक्कमेची बॅग चलाखीने चोरी करण्यात ही टोळी कुशल आहे. दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन इसमांची अशीच चोरी झाली म्हणून पोलीस ठाण्यात दोन गुन्हे नोंद केलेले होते. या गुन्ह्यांचा समांतर तपास युनिट ११ मार्फत चालु होता. तपासादरम्यान अनेक ठिकाणाचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासण्यात आले होते. काल २८/४/२२ रोजी युनिट ११ चे पोलीस हवालदार गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी मालाड येथे येणार होते. या बाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक घोने, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, पोलीस हवालदार तरटे, पोलीस हवालदार सुर्वे, पोलीस नाईक केनी, पोलीस नाईक कदम यांनी मालाड येथे सापळा लावून दोन संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींना कक्ष कार्यालयात आणून त्यांची चौकशी केली असताना त्यांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा अंधेरी येथील असल्याचे सांगितले. नंतर पोलिसांच्या याच पथकाने अंधेरी पश्चिम येथे जाऊन तीन आरोपींना ताब्यात घेऊन कार्यालयात आले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशी मध्ये त्यांनी हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले असून दिंडोशी पोलीस ठाणे येथील दुसऱ्या गुन्ह्यात सुद्धा त्यांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची वैदयकीय तपासणी करुन पुढिल कायदेशिर कारवाईकरीता दिंडोशी पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध मुंबईत अनेक ठिकाणी गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपी क्रं.1 याच्यावर एकूण 25 गुन्हे दाखल आहेत. आरोपी क्रं.2 याच्यावर एकूण 02 गुन्हे दाखल आहेत. आरोपी क्रं. 3 याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. आरोपी क्रं. 4 याचेवर एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी क्रं. 5 याच्यावर एकूण 6 गुन्हे दाखल आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे –  एकनाथ शिंदे 

News Desk

नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास!

News Desk

लखीमपूर खेरी घटनेसंदर्भात ठाकरे मंत्रिमंडळाकडून खेद!

News Desk