HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रातील निर्बंध शिथील होणार नाहीत ! बैठकीत तशी चर्चा नाही- राजेश टोपे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज (१४ जुलै) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. नागरिकांचं या बैठकीवर लक्ष होतं. बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीत ठराव झालेल्या मुद्यांबद्दल माहिती दिली आहे. त्यात प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारने आरोग्य विभागाशी संबंधित हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

बैठकीतले महत्वाचे मुद्दे

-साडेचार कोटी लस राज्याला मिळेल

-10 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त

-रोजची रुग्ण संख्या 7 ते 9 हजार

-92 टक्के रुग्ण 10 जिल्ह्यात

-दुकानांची वेळ वाढण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार

पर्यटन बदल महत्वाचे निर्णय

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटना बदल काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्याच्या सहसी पर्यटन धोरणाला मान्यता देण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसंच राज्यातील पीक विमा परिस्थितीचा आणि राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

लोकल अद्यापही बंदच

महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलं ते लोकल सुरु होण्यावर. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमावलीसह लोकल सुरु करण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवासाचा विचार व्हावा, अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली होती. मात्र, त्याबाबत आजच्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नसल्याचं आता स्पष्ट झालंय.

व्यापाऱ्यांना दिलासा नाही

दुसरीकडे राज्यभरात व्यापारी वर्ग कोरोना निर्बंधांविरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे. अनेक शहरात व्यापाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. त्यामुळे व्यापारी वर्गाचा संताप पाहता व्यापाऱ्यांबाबत काही सकारात्मक निर्णय होऊ शकतो, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याबाबतही या बैठकीत निर्णय झालेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन,  उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये थोडी वाढ, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढली

News Desk

कोरेगाव भीमा प्रकरणातील प्रमुख आरोपी वरवरा राव यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

News Desk