HW News Marathi
महाराष्ट्र

पूरग्रस्त मुलीच्या लग्नाचा खर्च दीपाली सय्यद उचलणार!

रायगड। रायगड मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जो प्रसंग घडला तोच सर्वांना माहित आहे. पूरग्रस्तांना पुन्हा उभं राहण्यासाठी अनेकांनी सढळ हाताने मदत केली. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांना यापूर्वी तब्बल 10 कोटींची मदत जाहीर केली होती. या मदतीनंतर दीपाली सय्यद यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथील पूरग्रस्त पूजा चव्हाणच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे. दीपाली सय्यद त्यांच्या चँरिटेबल ट्रस्टतर्फे पूजाच्या लग्नाचा खर्च उचलणार आहेत.

अनेकांची घरं उद्धवस्त झाली

रायगडमध्ये अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या दरडीखाली अनेकांची घरं उध्वस्त झाली तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथील पूजा चव्हाण या मुलीचे लग्न होते. पूजाच्या लग्नासाठी तिच्या घरच्यांनी काही दागिने जमवले होते. हे सर्व दागिने पूजाच्या आई-वडिलांनी शेजारी राहणाऱ्या भरत सुतार यांच्या घरात ठेवले होते. मात्र, पावसामुळे सुतार यांच्या घरावर दरड कोसळली आणि यातच पूजाच्या लग्नासाठी ठेवलेले सर्व दागिने दबून गेले होते.

लग्नाचा खर्च दीपाली सय्यद करणार

दीपाली सय्यद मागील काही दिवसांपासून पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी आज त्यांनी साखर सुतारवाडी येथे भेट दिली. तसेच येथे सय्यद यांनी दरडग्रस्त घरांची पहाणी केली. ही पाहणी करत असताना सय्यद यांना पूजा चव्हाणसोबत घडलेला प्रकार समजला. त्यानंतर सय्यद यांनी पुजा चव्हाण तसेच आईची भेट घेतली. या भेटीनंतर पूजाच्या लग्नाचा सर्व खर्च उचल्याची घोषणा केली. अभिनेत्री दीपाली सय्यद चँरिटेबल ट्रस्टतर्फे पुजा चव्हाणच्या लग्नाचा सर्व खर्च उचलला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती होताच फडणवीसांनी काढली मनोहर पर्रीकरांची आठवण!

News Desk

शिवसेना , काँगेस, राष्ट्रवादीसाठी मी अस्पृश्य, संभाजीराजेंसोबत जायला तयार – प्रकाश आंबेडकर

News Desk

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या!

News Desk