HW News Marathi
Covid-19

अजित पवारांनी शरद पवारांसमोर पुण्याच्या महापौर मुरलीधर मोहोळांचे तोंड भरून केले कौतुक

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभाव अशी त्यांची ओळख आहे. एखाद्या व्यक्तीने चांगले काम केले तर अजित पवार हे त्यांचे कौतुकही करतात. आज यांचा परिचय सर्वांनाच आला. अजित पवार यांनी आज (२६ जून) पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे तोंड भरून कौतुक केले. तेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर. विरोधी पक्षाचे पदाधिकारी असतानाही अजित पवारांनी केलेल्या या कौतुकाची चर्चा होत आहे.

पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खुद्द शरद पवार यांनी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत आयुक्त कार्यालयात बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले. या बैठकीवेळी शरद पवार यांना कोरोनाच्या उपाययोजनाबांबत माहिती देत असताना अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका करत असलेल्या कामाचे कौतुक केले.

यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना कडक इशारा म्हणाले की, “मी रोज सकाळी सात वाजता चार अधिकरयांना फोन करतो आणि आढावा घेतो. मग महापालिका आयुक्त, आणि जिल्हाधिकारयांनीही रोज आमदार, खासदारांना फोन कराच. मी अधिकरायांना फोन करतो; तेव्हा तुमही लोकप्रतिनिधींना करायलाच हवा. मला यापुढे तक्रार नको. एकत्र काम करा.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यावर चक्रीवादळाचे सावट, पंतप्रधानांकडून संपूर्ण मदतीचे आश्वासन

News Desk

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण देणार | मुख्यमंत्री

News Desk

राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू

News Desk