HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी “ती” चूक पाहून चक्क मारला कपाळाला हात!

अहमदनगर। अनेकदा आपल्या निदर्शनात शुद्धलेखनाच्या चुका या वाचनात येत असतात. आणि या चुका कधी बोलण्यातून होतात, कधी लिहिण्यातून होतात. आणि अगदी तसच वर्तमानपत्रं, पुस्तकं यांच्यापासून न्यूज चॅनल आणि न्यूज वेबसाईटपर्यंत अनेक बातम्यांमधील चुका या विनोद म्हणून सोशल मीडियावर देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेल्या पण बघतो. मात्र असाच प्रत्यय आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आला, आणि पवारांनी चक्क कपाळालाच हात मारला. अजित पवार यांनी उद्घाटनाच्या कोनशिलेवर असलेली एक मोठी चूक लक्षात आणून दिली. ती पाहून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र कपाळाला हात मारुन घेतला. आणि ही चूक चक्क राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावातच आढळून आली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव चक्क ‘हसन मुस्त्रीफ’ असं लिहिण्यात आलं होतं.

काय हो ती चूक?

उपमुख्यमंत्री अजित पवार हे अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन संपन्न सोहळा पार पडला. आणि यावेळी पारनेर मध्ये असताना संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर याच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अजित पवारांनी उद्घाटन केल्यानंतर कोनशिलेवर असलेल्या नावातील एक मोठी चूक लक्षात आणून दिलीय. कोनशिलेवर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावामध्ये झालेली शाब्दिक चूक अजितदादांनी दाखवून दिली आणि कपाळावर हात मारुन घेतलाय. या कोनशिलेवर मुश्रीफऐवजी ‘मुस्त्रीफ’ अशी शब्दरचना करण्यात आली होती.

एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री येत आहेत , म्हटल्यावर तेथे निटनिटकेपणा आणि टापटीपपणा असतोच. मंत्रीमहोदयांना कुठलिही बोलण्याची किंवा चुका काढण्याची संधी न देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन संपन्न सोहळा पार पडला. येथील कार्यक्रमात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच चूक पाहिली आणि कपाळावर हात मारून घेतला. हसन मुश्रिफ यांच्या नावातील चूक पाहून कपाळावरच हात मारला. संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर यांच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अजित पवारांनी उद्घाटन केल्यानंतर कोनशिलेवरील नावात असलेली चूक लक्षात आणून दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Tauktae Cyclone : मुंबईपासून150 किमी अंतरावर, पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार, ऑरेंज अलर्ट जारी

News Desk

‘सुशासन’ अंमलबजावणीत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

माहिती आणि प्रसारण खाते मिळालेल्या प्रकाश जावडेकरांबद्दल या गोष्टी जाणून घ्या

News Desk