HW News Marathi
Covid-19

बाप्पाच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल !

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२२ ऑगस्ट) राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “बाप्पांच्या आगमनाने घराघरात आनंद… उत्साह… चैतन्याचे… भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन साजरा होईल. श्रीगणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल” असा विश्वास व्यक्त देखील अजित पवारांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे, गणेशोत्सव काळात नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

“राज्यावरील कोरोनाचे संकट दूर कर. महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर”, असे साकडे उपमुख्यमंत्र्यांनी श्री गणेशाकडे केले आहे. कोरोना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. “सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही. बुद्धीची देवता असलेल्या श्रीगणरायांच्या समस्त भक्तांनी घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महानगरपालिकेकडून ‘फेसमास्क’ न वापरणा-यांकडून एका दिवसात ३२ लाखांची दंड वसुली रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, क्लब, जिमखाना इत्यादींमध्येही धडक कारवाई

News Desk

राज्यात आज ४३१ नवीन रुग्णांचे निदान, एकूण रुग्ण संख्या ५६४९ वर

News Desk

पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार, लॉकडाऊनसंदर्भात होणार चर्चा

News Desk